प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हय़ात कोविडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्हय़ात दिवसभरात 505 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये महसूल विभागाने गुरुवारी एका दिवसात 24 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 4 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला. तर पोलिसांनी 387 व्यक्तींवर कारवाई करत 82 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला. तर नगरपालिका क्षेत्रामध्ये 59 व्यक्ती विनामास्क आढळून आल्या. त्यांच्याकडून एकूण 12 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात 18 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्याप्रकरणी कारवाई करून 3 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गुरुवारी दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडाची रक्कम 1 लाख 6 हजार 300 रुपये आहे.
त्याशिवाय जिल्हय़ातील महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाकडून एकूण 357 ठिकाणांची तपासणी करण्यात आली. त्यात चार ठिकाणी कोविडच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. कोरोनाचा वाढता
प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करावे. तसेच मास्क, हॅन्ड सॅनिटायझरचा वापर आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.