प्रतिनिधी/ सातारा
जिह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी पाच दारु अड्डय़ांवर छापे टाकून 60 हजार 692 रुपयांची अवैध दारु हस्तगत केली आहे. यामध्ये पाटण येथे मोठी कारवाई करण्यात आली असून यामध्ये 56 हजार 298 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत पा]िलसांनी दिलेली माहिती अशी, निसरे फाटा, (ता.पाटण) येथील श्रद्धा हॉटेलच्या मागील भिंतीच्या आडोशाला श्रीकांत विश्वास बामणे (रा. शिवलिंग अपार्टमेंट, पाटण) याच्याकडून 56 हाजार 298 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. पळशी, (ता.माण) गावच्या हद्दीत आयुष टायर्स सर्व्हिसिंग सेंटर दुकानात शंकर पांडुरंग चव्हाण (रा. पळशी, ता. पाटण) याच्याकडून 1 हजार 950 रुपयांची देशी दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. तर वडगाव हवेली, (ता.कराड) गावच्या हद्दीतून आत्माराम विठ्ठल मदने यांच्याकडून 780 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.
कराड येथील पोस्टल कॉलनी शेजारी झोपडपट्टीच्या आडोशाला पत्र्याच्या शेडमध्ये बसवराज लिंगाप्पा कट्टमणी (रा. कोळेकर हॉस्पीटल शेजारी, शनिवार पेठ कराड) याच्याकडून 676 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या. धकटवाडी (ता.खटाव) येथे घराच्या आडोशाला आशा कृष्णात लावंड हिच्याकडून 988 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या हस्तगत करत या सर्वांवर कारवाई करण्यात आली आहे.