सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 10 जणांचा मृत्यू, 971 जण झाले बरे : कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
शुक्रवारी बेळगाव शहर व जिल्हय़ात 1300 हून अधिक नवे रुग्ण आढळून आले असून 971 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांच्या संख्येने 55 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 971 जणांना वेगवेगळय़ा इस्पितळांतून घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 37 हजार 876 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्हय़ात 16 हजार 716 सक्रिय रुग्ण आहेत. लक्षणे नसणाऱयांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
आतापर्यंत 7 लाख 46 हजार 470 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 6 लाख 84 हजार 862 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अद्याप 19 हजार 531 हून अधिक जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. तर 2 हजार 628 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त झालेल्या 17 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. तर ‘सारी’चे 22 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांनाही घरी पाठविण्यात आले आहे.
अगसगा, कंग्राळी बी.के., बाळेकुंद्री खुर्द, शिवापूर, हिरेबागेवाडी, भेंडीगेरी, काकती, देसूर, आंबेवाडी, गौंडवाड, गणेशपूर, हिंडलगा, मारिहाळ, कंग्राळी के.एच., होनिहाळ, मच्छे, मोदगा, मुतगा, मुत्नाळ, निलजी, के. के. कोप्प, सुळगा, उचगाव, यमनापूर, विजयनगर, वडगाव, वैभवनगर, वंटमुरी कॉलनी, वीरभद्रनगर, अनगोळ, बसवकॉलनी, मारुतीनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
भवानीनगर, रामतीर्थनगर, द्वारकानगर, शिवाजी कॉलनी, अनगोळ, हनुमाननगर, भाग्यनगर, हिंडाल्को कॉलनी, कणबर्गी, कुवेंपूनगर, शहापूर, महांतेशनगर, सदाशिवनगर, शाहूनगर, सहय़ाद्रीनगर, समर्थनगर, संतिबस्तवाड, हिंदवाडी, शास्त्राrनगर, श्रीनगर, रामतीर्थनगर, हिंदूनगर, खासबाग, अलारवाड, अमननगर, अशोकनगर, अंजनेयनगर, बसवन कुडची, मजगाव, नार्वेकर गल्ली, नेहरूनगर, उद्यमबाग, भांदूर गल्ली, भाग्यनगर, चव्हाट गल्ली, चन्नम्मानगर, गांधीनगर, गोवावेस, शिवबसवनगर परिसरातही रुग्ण आढळून आले आहेत.
निपाणीत कोरोनाने घेतला चौघांचा बळी
कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याचे दिसत असले तरी मृत्यूचे प्रमाण मात्र वाढतच आहे. शुक्रवारी निपाणी शहरात
कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गेल्या 24 दिवसांमध्ये निपाणी तालुक्यात 125 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय अनेक कोरोनाबाधितांची नोंद नसल्याने तसेच अनेकांवर परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आल्याने हा आकडा यापेक्षा कितीतरी अधिक असल्याची भीती जाणकारांतून व्यक्त होत आहे.