अद्याप 10 लाख जनावरे शिल्लक, पावसाचा अडथळा, 15 नोव्हेंपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
बेळगाव / प्रतिनिधी
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हय़ात ‘लाळय़ा खुरकत’ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील साडे तीन लाख जनावरांना लसीकरण करण्याचे काम पूर्ण झाले असून अद्याप तब्बल दहा लाखांहून अधिक जनावरे शिल्ल्क असल्याची माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे लसीकरणाचे काम आठवडाभर लांबणीवर पडले होते. त्यातच सध्या परतीच्या पावसामुळे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे येत्या 20 ते 25 दिवसात खात्यासमोर 10 लाख जनावरांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.
जिल्हय़ातील गाय, म्हैस, बैल अशा 13 लाख 95 हजार जनावरांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट खात्यासमोर होते त्यापैकी गेल्या पंधरा दिवसात केवळ तीन लाख जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. घरोघरी लसीकरण पोहोचविण्यासाठी जिल्हय़ात 106 पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये एक पशुवैद्यकिय अधिकारी, एक पशुपरिक्षक, एक मैत्री कर्मचारी, एक मदतनीसाचा समावेश आहे. प्रत्येक पशुपालकांच्या गोठय़ापर्यंत ही मोहिम पोहोचविण्यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. टॅग नसलेल्या जनावरांना टॅगिंग करून लसीकरण करण्यात येत आहे. त्याबरोबर सर्व नोंद ऑनलाईन पध्दतीने ठेवण्यात येत असल्याने वेळ लागत आहे. त्यामुळे काम संथगतीने होत असल्याची माहिती खात्याने दिली आहे.
शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे जिल्हय़ात जनावरांची संख्या अधिक आहे. जिल्हय़ात असलेल्या 261 लहान-मोठय़ा पशुवैद्यकिय दवाखान्याअंतर्गत घरो-घरी जाऊन ही मोहिम राबविली जात आहे. अलिकडच्या काही वर्षात लाळय़ा खुरकतची मोठय़ा प्रमाणात लागण होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर खात्यामार्फत वर्षभरात दोन टप्प्यात ही मोहिम राबविली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे पहिल्या टप्प्यातील मोहिमेला स्थगिती मिळाली होती. मात्र आता दुसऱया टप्प्यातील मोहिम सुरू आहे. लाळय़ा खुरकतची लागण झाल्यास जनावर आजारी पडून दूध क्षमता कमी होते. रोग अतिप्रमाणात झाल्यास जनावर दगावण्याची शक्मयता असते. त्यामुळे सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना ‘लाळय़ा खुरकत’ प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही खात्यामार्फत करण्यात आले आहे.
जिल्हय़ात बेळगावमध्ये दोन गोकाक व चिकोडीमध्ये एकेक अशी एकूण चार ठिकाणी व्हॅक्सिन डेपोची निर्मिती करण्यात आली आहे. याव्दारे संबंधित पशुवैद्यकिय दवाखान्यांना लसीकरणासंबंधी साहित्य पुरविले जात आहे. लसीकरण पथकाला एन-95 मास्क, सॅनिटायझर व फेश शिल्डची पुर्तता करण्यात आली आहे. कोरोनाचे नियम व सामाजिक अंतर राखून लसीकरण करण्याचे काम करावे लागत आहे. जिल्हय़ात असलेल्या 62 मैत्री कर्मचारी या कामासाठी मदत मिळत आहे. या मोहिमेसाठी कर्नाटक मिल्क फेडरेशनने (केएमएफ) 100 वाहनांची मोठी मदत मिळाली असून लसीकरणासाठी गावो-गावी फिरणे सोयीस्कर झाले आहे.