घरोघरी जाऊन देणार जनावरांना लस
प्रतिनिधी/ बेळगाव
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सोमवार दि. 13 पासून जिल्हय़ात लाळय़ा खुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. पशुसंगोपन खात्यामार्फत गाय-म्हैस, बैल आणि कुत्र्यांना घरोघरी जावून लस दिली जाणार आहे. या मोहिमेत चार वर्षावरील पाळीव जनावरांना पहिल्या टप्प्यात 11 जानेवारीपर्यंत लस दिली जाणार आहे. जिल्हय़ातील सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना लस टोचून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंगोपन खात्याने केले आहे.
जिल्हय़ात 28 लाख तर तालुक्मयात 1 लाख 78 हजार जनावरांची संख्या आहे. अलिकडे पाळीव जनावरांच्या संख्येत वाढ झाली आहे. या सर्व जनावरांना लाळय़ा खुरकत प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. गतवषीपासून लाळय़ा खुरकत लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे. दरम्यान अनेक जनावरांना लागण झाल्याने पशुपालकांच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला होता. यंदा पहिल्या टप्प्यातील जून दरम्यानची लसीकरण मोहीमदेखील झाली नाही तर दुसऱया टप्प्यातील ऑक्टोबर महिन्याची लसीकरण मोहीम देखील लांबणीवर पडली होती. मात्र आता 13 डिसेंबरपासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार असल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.
लाळय़ा खुरकत हा विषाणुजन्य रोग असल्याने हवेत पसरतो आणि तात्काळ सर्व जनावरांना याची लागण होते. त्यामुळे जनावरांच्या जिभेला पुरळ उठून जखमा होतात. दरम्यान दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमतादेखील कमी होते. हा रोग अतिप्रमाणात झाल्यास जनावर दगाविण्याची शक्मयता देखील अधिक असते. जिल्हय़ातील कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असणाऱया तालुक्मयातील जनावरांना लाळय़ा खुरकतची अधिक लागण झाली आहे. मात्र शासनाकडून लस पुरवठा न झाल्याने मोहीम लांबणीवर पडली होती. मात्र आता लस दाखल झाली असून येत्या सोमवारपासून जिल्हय़ात प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जाणार आहे.