एटीएसमधील दोन जवानाला कोरोनाची लागण : खासगी डॉक्टराचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
शुक्रवारी बेळगाव शहर व जिल्हय़ातील आणखी 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 29 वर पोहोचली असून एक खासगी डॉक्टर व सांबरा एटीएसमधील दोघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
बेनकनहळ्ळी, न्यूगांधीनगर, शाहूनगर, वडगाव, शास्त्राrनगर, धर्मवीर संभाजी चौक परिसरात शुक्रवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एका खासगी डॉक्टरचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. अद्याप 6 हजार 62 जणांचा अहवाल यायचा आहे.
जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार सक्रिय रुग्णांची संख्या 214 इतकी आहे. आतापर्यंत 25 हजार 471 जणांनी कोरोनावर मात केली असून शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 14 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. अद्याप 40 हजार 361 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.
बेळगाव शहर व उपनगरांतील सहा व ग्रामीण भागातील तीन असे बेळगाव तालुक्मयातील 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत 342 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने स्वॅब तपासणी वाढविली असून रुग्ण संख्येतील चढ-उतार सुरूच आहे.