दोघा जणांनाचा मृत्यू, बेळगाव तालुक्यात 34 नवे रुग्ण
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मंगळवारी जिल्हय़ात 188 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. बेळगाव तालुक्मयात 34 जण कोरोनाबाधित आढळले असून 26 रुग्ण शहरामधील तर 8 जण ग्रामीण भागातील असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभाग प्रयत्न करत आहेत. तरी देखील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे ही संख्या वाढत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर तसेच उपनगरांमध्ये रुग्णांची संख्या वाढु लागली आहे. डॉक्टर, कर्मचारी, व पोलिसांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.
मंगळवारी शहापूर, लक्ष्मीटेक, नागझर कॅम्प-वडगाव, हिंडाल्को कॉलनी, टिळकवाडी, हिंदवाडी, वैभवनगर या परिसरात रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर मच्छे, बडस, यासह इतर खेडय़ांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मृतांमध्ये गोकाक येथील एका महिलेचा समावेश आहे. याचबरोबर शहरातीलही एक महिलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.