68 हजारांचा मुद्देमाल जप्त – 24 जणांवर गुन्हे
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ात विविध सातारा दलातील कर्मचाऱयांनी अवैध दारु विक्री करणाऱयांवर छापे टाकून याप्रकरणी 23 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्या ताब्यातील 68 हजार 705 रुपये किंमतीच्या अवैध देशी, विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. यापैकी कोणालाही अटक झालेली असून सर्वांना प्रतिबंधत्मक नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
याप्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर जगन्नाथ जाधव (रा. तोंडले, ता. माण), तारगाव( ता. कोरेगाव) येथे संजय रमेश जाधव (रा. गोसावीवस्ती, तारगाव), खडकी (ता. वाई) येथे प्रतिभा चंद्रशेखर मच्छले, रामिष्टेवाडी (ता. पाटण) येथे अशोक तुकाराम निगडीकर यांच्यावर कारवाई करत त्यांच्या ताब्यातील 3 हजार 890 रुपयांची अवैध दारु जप्त केली आहे.
थदाळे (ता. माण) येथे नमाज श्रीरंग भोसले, मरळी (ता. पाटण) येथे सुहास व्यकंट पाटील, ओंड (ता. कराड) येथे उमेश नाना जाधव, फलटण रविवार पेठेत रोहिदास परशुराम मदने, भोळी (ता. खंडाळा) येथे विकास विलास भोसले, शेखमिरवाडी (ता. खंडाळा) येथे सुरेंद्र राजेंद्र कुंभार व फलटण सोमवार पेठेत दत्तात्रय अशोक पवार यांच्यावर कारवाई करत त्यांच्या ताब्यातील 7 हजार 815 रुपयांची अवैध दारु जप्त केली आहे.
कोरेगाव (ता. कराड) येथे स्वप्नील तुकाराम कुंभार, वाई एमआयडीसीत रोहन शंकर सूर्यवंशी, खंडाळा शहरात मनोज कवठेकर, शेरे (ता. कराड) येथे धनाजी शंकर निकम, बोरी (ता. खंडाळा) येथे मनोज तानाजी धायगुडे, म्हासोली (ता. कराड) येथे आनंदा रामचंद्र पवार व वानरवाडी (ता. कराड) येथे अनिल बाबूराव तोडकर यांच्यावर कारवाई करत त्यांच्या ताब्यातील 53 हजार 170 रुपये किंमतीच्या अवैध दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
अंबवडे (ता. खटाव) येथे प्रल्हाद नामदेव पवार, खटाव येथे गणेश गोरख सकटे, कातरखटाव (ता. खटाव) येथे अविनाश हणमंत पाटोळे, मांडवे (ता. खटाव) येथे गणेश शंकर अवघडे व शिरवडे (ता. कराड) येथे हणमंत तात्याबा साळुंखे यांच्यावर कारवाई करत पोलिसांनी त्यांच्याकडील 3 हजार 830 रुपयांची दारु जप्त केली आहे. दहिवडी, रहिमतपूर, शिरवळ, तळबीड, कराड, वडूज, पुसेगाव, भुईंज, दहिवडी, ढेबेवाडी, फलटण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी हे छापे टाकले आहेत.