चिकोडी तालुक्मयातील वृद्धेचा मृत्यू : 533 सक्रिय रुग्ण
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या 24 तासांत बेळगाव जिल्हय़ातील 17 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आणखी 31 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चिकोडी तालुक्मयातील एका 82 वषीय वृद्धेचा बेळगाव येथे मृत्यू झाला.
संभाक्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांचा आकडा 78 हजार 387 इतका झाला आहे. तर आतापर्यंत 76 हजार 987 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
अद्याप 533 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मृतांचा सरकारी आकडा 867 वर पोहोचला आहे. बुधवारी अथणी, खानापूर, बैलहोंगल तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही तर सौंदत्ती, रायबाग, गोकाक तालुक्मयात प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बेळगावपेक्षाही चिकोडी तालुक्मयात रुग्णसंख्या वाढती आहे. गेल्या आठवडय़ाभरात मृतांचा आकडा घटत चालला आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागावरील ताण तूर्त कमी झाला असला तरी तिसरी लाट व डेल्टाप्लसचा धोका लक्षात घेऊन प्रशासन कामाला लागले आहे.