मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ातील मतदार याद्यांचे पूनर्रिक्षण कार्यक्रम 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत राबवण्यात येत आह़े नजीकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार असल्याने प्रारुप यादीमध्ये मतदारांनी नाव तपासावे व नाव नसल्यास नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केल़े ते शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत़े यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे उपस्थित होत़े
जिल्हय़ामध्ये 4 लाख मतदारांची एकापेक्षा जास्त नावे आढळून आली आहेत़ तसेच 28 लाख मतदान ओळखपत्रे नव्हत़ी 18 लाख मतदार आपल्या पत्यावर राहत नसल्याचे आढळून आले आह़े लोकसंख्येनुसार 18 ते 19 वयोगटातील 3.30 टक्के लोकसंख्या आह़े मात्र मतदार यादीमध्ये यातील केवळ 1.23 टक्के नोंद झाली आह़े लोकसंख्येनुसार 19 ते 29 वयोगटातील 18 टक्केपैकी केवळ 13 टक्के तरुणांची नावे मतदार यादीमध्ये असल्याची माहिती देशपांडे यांनी दिल़ी दिव्यांग मतदारांसाठी चिन्हांकित खुण ऍपवर करण्याची सोय करण्यात आली असून केवळ 4 लाख दिव्यांगापैकी केवळ 69 जणांनी आपल्या नावासमोर खुण केली आह़े ही खूण मतदार दिव्यांग असल्याची निर्दशक असल्याचे ते म्हणाल़े मतदार नाव नोंदणीसाठी तसेच इतर दुरुस्तीसाठी मोबाईल De@He, पोर्टल तसेच ऑनलाईन, ऑफलाईन पर्यायाचा उपयोग करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिह्यातील 5 विधानसभा मतदार संघामध्ये 1708 मतदान केंद्रे असून यासाठी 1703 बीएलवो नियुक्त करण्यात आले आहेत़ 1 नोव्हेंबर रोजी पाच विधानसभा मतदार संघातील 634178 पुरूष तर 684955 स्त्राr मतदार असून 9 इतर मतदार आहेत़
विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत नागरिकांनी मतदार यादीतील नोंदणी तपासणी व नवीन नाव नोंदणीसाठी प्रत्येक गावामध्ये मतदार यादीच्या चावडी वाचनाचा उपक्रम प्रत्येक नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीमध्ये 16 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितल़े
संक्षिप्त कार्यक्रम –
प्रारुप मतदार यादीमधील दावे व हरकती स्वीकारणे 1 ते 30 नोव्हेंबर
विशेष मोहीमांचा कालावधी 13,1427,28 नोव्हेंबर
वेशेष ग्रामसभा 16 नोव्हेंबर
दावे व हरकती निकालात काढणे 20 डिसेंबर
मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी 05 जानेवारी