शुक्रवारी 20 नवे रुग्ण : 3,787 जणांनी घेतली लस
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या 24 तासांमध्ये बेळगाव जिल्हय़ातील 420 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शुक्रवारी कोरोनाचे 20 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील पाच जणांचा समावेश आहे. सध्या 179 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी 6 हजार 463 जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 3 हजार 787 जणांनी लस घेतली आहे.
सदाशिवनगर, टिळकवाडी, होन्नीहाळ, उचगाव परिसरातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 618 इतकी झाली आहे तर आतापर्यंत 26 हजार 89 जणांनी कोरोनावर मात केली असून शुक्रवारी 12 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार अद्याप 3,959 जणांचे अहवाल यायचे आहेत. शुक्रवारी 6 हजार 463 जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 3 हजार 787 जणांनी लस घेतली आहे. यावरुन लसीकरण धिम्यागतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. अद्याप 41,202 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत 4 लाख 57 हजार 82 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 4 लाख 24 हजार 460 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 179 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत.