सक्रिय रुग्णांची संख्या 208 : आणखी 13 पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हय़ात शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 771 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 208 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आणखी 13 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एच. चव्हाण यांनी दिली.
जिल्हय़ातील सद्यस्थिती : शनिवारचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 13, सद्यस्थितीतील सक्रिय रुग्ण 208, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्हय़ाबाहेर गेलेले रुग्ण सात, बरे झालेले रुग्ण 5,771, मृत झालेले रुग्ण 164, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 6,149, चिंताजनक रुग्ण 4.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 434, दोडामार्ग – 355, कणकवली – 1868, कुडाळ – 1389, मालवण – 531, सावंतवाडी – 824, वैभववाडी – 182, वेंगुर्ले – 546, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 20.
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण : देवगड – 9, दोडामार्ग – 4, कणकवली – 41, कुडाळ – 32, मालवण – 17. सावंतवाडी – 43, वैभववाडी – 7, वेंगुर्ले – 10, जिल्हय़ाबाहेरील – तीन.
तालुकानिहाय मृत्यू : देवगड – नऊ, दोडामार्ग – चार, कणकवली – 41, कुडाळ – 32, मालवण – 17, सावंतवाडी – 43, वैभववाडी – सात, वेंगुर्ले – 10, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – एक.
आरटीपीसीआर आणि ट्रुनॅटटेस्ट टेस्ट रिपोर्टस् : तपासलेले नमुने शनिवारी 415, एकूण 30,622. पॉझिटिव्ह आलेले नमुने 4285.
ऍन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने : शनिवारी 73, एकूण 23 हजार 256 पैकी पॉझिटिव्ह 1986. तसेच शनिवारी पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – चार आणि यापैकी ऑक्सिजनवर असणारे – तीन, व्हेंटिलेटरवर असणारे – एक.