कोरोना रूग्णसंख्या वाढतीच
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना रूग्णसंख्येत वाढच होताना दिसत आहे. जिह्यात गेल्या 24 तासात तब्बल 610 नवे कोरोनाबाधित सापडल़े त्यामुळे जिह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 38 हजार 72 झाली आह़े सलग दुसऱया दिवशी जिह्यामध्ये 600 पेक्षा अधिक कोरोनाबाधित सापडले आहेत़ तर बुधवारी 8 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा
जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या माहितीनुसार, बुधवारी आरटीपीआर चाचणीमध्ये 423 तर रॅपिड ऍन्टीजन चाचणीमध्ये 177 कोरोनाबाधित सापडले आहेत़ तसेच 8 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्हय़ात 1255 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बुधवारी मृत्यू झालेल्यांमध्ये खेड तालुक्यातील 2 तर दापोली, लांजा, रत्नागिरी, राजापूर, गुहागर व चिपळूण प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली आहे.