नऊ आदर्श शाळांसाठी सहा कोटीचा निधी मंजूर : जि. प. शिक्षण समिती सभेत माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
पटसंख्येअभावी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 76 शाळा बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जि. प. च्या शिक्षण समिती सभेत देण्यात आली. त्यानंतर मोक्मयाच्या ठिकाणी असलेल्या शाळा भाडेतत्त्वावर देण्याचा विचार करावा. तर कळणेसारख्या दुर्गम शाळा बंद करू नयेत, अशी भूमिका समिती सदस्यांनी मांडली. जिल्हय़ातील नऊ आदर्श शाळांच्या भौतिक सुविधांसाठी समग्र शिक्षा अभियानामधून सहा कोटीचा निधी मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली.
जि. प. च्या शिक्षण समितीची सभा सभापती डॉ. अनिशा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी समिती सदस्य दादा कुबल, राजन मुळीक, संपदा देसाई, वर्षा कुडाळकर, समिती सचिव सुनील मदरुपकर, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
कळणेसारख्या दुर्गम शाळा बंद करू नये!
पटसंख्येअभावी बंद कराव्या लागलेल्या शाळांचा आढावा घेण्यात आला असता कुडाळ तालुक्मयात नऊ शाळा तसेच सावंतवाडी बारा, दोडामार्ग चार, वेंगुर्ले सहा, कणकवली नऊ, मालवण तेरा, वैभववाडी नऊ आणि देवगड तालुक्मयातील चौदा अशा एकूण 76 शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली. तसेच 76 पैकी 27 शाळा हय़ा मोक्मयाच्या ठिकाणी असल्याचे सांगताच अशा मोक्मयाच्या ठिकाणी असलेल्या शाळा भाडेतत्त्वावर देण्याचा विचार करावा, अशी सूचना दादा कुबल यांनी मांडली. तर कळणेसारखी अवघड क्षेत्रातील शाळा असून पाच किलोमीटर परिसरात दुसरी शाळा नाही. त्यामुळे अशा दुर्गम शाळा बंद करू नये, अशी सूचना संपदा देसाई यांनी मांडली.
नऊ आदर्श शाळांसाठी सहा कोटीचा निधी मंजूर
जिल्हय़ातील नऊ आदर्श शाळांसाठी समग्र शिक्षा अभियानामधून सहा कोटीचा निधी मंजूर झाल्याची माहिती समग्र शिक्षा अभियानाच्या अधिकारी स्मिता नलावडे यांनी दिली. जिल्हय़ात आदर्श शाळा म्हणून निवडलेल्या जामसंडे नं. 1, साटेली-भेडशी, खारेपाटण नं. 1, पावशी नं. 1, आचरे नं. 1, चराठे, लोरे हेळेवाडी, उभादाडा नं. 1, आडेली नं. 1 या न शाळांच्या भौतिक सुविधांसाठी म्हणजेच शाळा इमारत बांधकाम व दुरुस्ती, संरक्षक भिंत, खेळाचे साहित्य व इतर सुविधांसाठी 12 कोटीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यामधून सहा कोटीचा निधी मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली.
कोविडने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी योजना राबवा
कोविडमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या जि. प. शाळांतील सर्व मुलांची माहिती गोळा करण्यात यावी आणि या मुलांना नाविन्यपूर्ण योजनेमधून विशेष योजना राबवावी आणि मदत करावी, अशी सूचना दादा कुबल यांनी मांडली.
पुरस्कारासाठी शिक्षक अपात्र ठरले नव्हते
गतवषी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अपात्र ठरलेल्या शिक्षकांना यावषी पुरस्कार कसे काय दिले, असा प्रश्न वर्षा कुडाळकर यांनी उपस्थित केला असता गतवषी शिक्षक पुरस्कारासाठी कुणी अपात्र ठरले नव्हते, तर आवश्यक तेवढे प्रस्ताव आले नव्हते. त्यामुळे गतवषी पुरस्कार देता आले नाहीत. यावषी थोडे धोरण बदलून एक प्रस्ताव आला, तरी पुरस्कार देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे पुरस्कार देण्यात आले आहेत. किमान 15 वर्षे सेवा आणि उत्कृष्ट काम केलेल्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आल्याची माहिती शिक्षण सभापतींनी दिली.
शाळा दुरुस्तीची 234 कामे मंजूर करण्यात आली होती. त्यातील 22 कामे पूर्ण झाली असून 62 कामे प्रगतीपथावर आहेत. तर इतर कामे ही निविदा प्रक्रियेमध्ये आहेत, अशी माहिती देण्यात आली.