एकूण 6 लाख हेक्टरमध्ये पेरणी : यावषी 7 लाख 16 हजार 923 हेक्टरमध्ये पिके घेण्याचे उद्दिष्ट
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ामध्ये वर्षात दोनवेळा पेरणी केली जाते. पावसाळय़ात खरीप तर हिवाळय़ात रब्बी पिके घेतली जातात. खरीप पेरणीचे दरवषी उद्दिष्ट ठरविले जाते आणि या उत्पादनावरच राज्याचा अर्थसंकल्प अवलंबून असतो. यावषी जिल्हा कृषी विभागातर्फे 7 लाख 16 हजार 923 हेक्टरमध्ये पिके घेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यामधील 6 लाख 1 हजार 23 हेक्टरमध्ये पेरणी पूर्ण झाली आहे.
खरीप पेरणीलाच अधिक महत्त्व दिले जाते. आतापर्यंत 84 टक्के पेरणी पूर्ण झाल्याचे कृषी विभागाने सांगितले तर आणखी 16 टक्के पेरणी शिल्लक असून ती लवकरच पूर्ण होईल, अशी आशा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. खरीप हंगामामध्ये ऊस, भात, भुईमूग, कापूस, मका, जोंधळा, बाजरी, तुरडाळ, मूग, सूर्यफूल यासह इतर पिके घेतली जातात. पावसावरच ही सर्व पिके अवलंबून असतात. यावषी मान्सूनचे आगमन झाले. मात्र जोरदार पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली आहे.
अथणी तालुक्मयामध्ये आतापर्यंत 68 हजार 305 हेक्टरमध्ये पेरणी पूर्ण झाली आहे. बैलहोंगल तालुक्मयाने पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण केले असून उद्दिष्टापेक्षाही 66 हेक्टरमध्ये अधिक पेरणी केली आहे. पावसाने चांगली साथ दिल्यामुळे शेतकऱयांनी पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. त्यापाठोपाठ खानापूर तालुक्मयात पेरणी झाली असून एकूण 47 हजार 507 हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली आहे. त्यानंतर गोकाक तालुक्मयात पेरणी अधिक प्रमाणात झाली असून 88 हजार 466 हेक्टरमध्ये पेरणी पूर्ण झाली आहे तर सर्वात कमी बेळगाव तालुक्मयात पेरणी झाली आहे. केवळ 38 हजार 420 हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.
खरीप हंगामामध्ये शेतकरी मोठे उत्पादन घेतात. शेतकरी माळवट जमिनीमध्ये विविध प्रकारची पिके घेतात. बऱयाच ठिकाणी अजूनही पाण्याची सोय नाही. त्यामुळे त्या ठिकाणी रब्बी पिके घेणे अशक्मय आहे. मात्र खरीप हंगामात पावसावर शेतकरी मोठय़ा कष्टाने शेतीमध्ये पेरणी करून उत्पादन घेत असतात.
तालुकानिहाय झालेले पेरणीचे उद्दिष्ट
तालुका | खरीपाचे देण्यात आलेले उद्दिष्ट (हेक्टरमध्ये) | पूर्ण झालेली पेरणी (हेक्टरमध्ये) |
अथणी | 91020 | 68305 |
बैलहोंगल | 77700 | 77766 |
बेळगाव | 51188 | 38420 |
चिकोडी | 89785 | 70092 |
गोकाक | 107825 | 88466 |
हुक्केरी | 63965 | 54231 |
खानापूर | 50020 | 47507 |
रायबाग | 61730 | 45845 |
रामदुर्ग | 52695 | 47894 |
सौंदत्ती | 70995 | 63297 |
एकूण | 716923 | 601823 |