जिल्हाधिकाऱयांची पत्रकार परिषदेत माहिती : रेमडेसिवीरसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हय़ातील सर्व रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा पुरेसा असून पूर्वी जिल्हय़ाला 15 केएल ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत होता. मात्र, आता त्यामध्ये राज्य सरकारने वाढ केली असून 22 केएल इतका पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. एम. जी. हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ऑक्सिजन पुरवठा, कोरोना रुग्णांची संख्या आणि रेमडेसिवीर याबाबत त्यांनी माहिती दिली. कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी कोविड रुमची आणि केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. केवळ हॉस्पिटलमध्येच उपचार करण्यासाठी काम केले जात नाही तर जे रुग्ण घरी उपचार घेत आहेत, त्यांना उपचारासंदर्भात माहिती दिली जात आहे. दूरध्वनीद्वारे त्यांना सर्व ती माहिती देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सांगितले.
सिव्हिल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध बेडची माहिती घेतली जात आहे. ती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आता जिल्हय़ाबरोबरच तालुक्मयातही एकूण 25 कोविड केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी 66 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले. वसतिगृह, धर्मशाळा आणि महाविद्यालये या ठिकाणीही बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. एकूण 980 बेडसंख्या असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी आरोग्य केंद्रात सध्या 320 बेड उपलब्ध आहेत. एकूणच बेड उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र आणि राज्य सरकारकडून लसपुरवठा
लसीकरणाबाबत ते म्हणाले, जिल्हय़ामध्ये एकूण 38 लाख 77 हजार 504 लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यामधील 6 लाख 72 हजार 232 लोकांना लस देण्यात आली आहे. 5 लाख 44 हजार 589 लोकांना पहिला डोस तर 1 लाख 27 हजार 643 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आता 4 लाख 16 हजार 946 जणांना दुसरा डोस देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्राकडून एकूण 1 हजार 190 लस बॉटल तर राज्य सरकारकडून 2 हजार 480 लस बॉटल पुरविण्यात आल्या आहेत. अशा एकूण 3 हजार 670 कोव्हॅक्सिन लस बॉटल देण्यात आल्या आहेत. कोविशिल्डच्या केंद्रातर्फे 9 हजार 80 आणि राज्यातर्फे 12 हजार 560 अशा एकूण 21 हजार 640 बॉटल्स देण्यात आल्या आहेत. 18 ते 44 वयोगटातील 22 लाख 95 हजार 518 जणांना 4 हजार 125 लस बॉटल देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड रुग्णसंख्येची माहिती
कोविड रुग्णसंख्येबाबत त्यांनी सांगितले, 1 ते 15 मेपर्यंत 1 लाख 82 हजार 740 जणांचे द्रव नमुने गोळा करण्यात आले. त्यामध्ये 17 हजार 982 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 7 हजार 580 जण बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सध्या 10 हजार 464 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याचबरोबर 8 हजार 320 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. तर 2 हजार 144 कोविड रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
मृत्यूच्या प्रमाणाबाबत त्यांनी सांगितले की, केवळ 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. गेल्या दहा दिवसांतील ही आकडेवारी आहे. त्यामुळे बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय रुग्णालयांमध्ये एकूण 4 हजार 146 बेड उपलब्ध असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी उपस्थित होते.
रेमडेसिवीरचाही पुरवठा सुरळीत
सरकारी हॉस्पिटल तसेच खासगी रुग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करण्यात आली आहेत. आतापर्यंत 12 हजार 902 वाईल्स पुरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये 12 हजार 750 सरकारी तर सध्या 150 वाईल विविध हॉस्पिटल्सकडे उपलब्ध असल्याचे सांगितले. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्यासाठी वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. त्या वेबसाईटवर रुग्णाची माहिती तसेच हॉस्पिटलची माहिती दिल्यानंतरच त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन पाठविण्यात येत आहे.