872 बाधित; 20 जणांचा बळी , दिवसभरात 1008 जण कोरोना मुक्त झाले
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात तब्बल चार दिवसानंतर हजाराच्या खाली कोरोना बाधित आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे. पॉझिटीव्हीटी रेट कमी झाला आहे. गेल्या चोवीस तासात 872 जण नव्याने कोरोना बाधित आढळून आले तर 20 जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. कोरोनामुक्त दिवसभरात 1008 झाले आहेत. कराड तालुका हॉटस्पॉट असून कराड तालुक्यात 259 जण बाधित तर सातारा तालुक्यात 159 जण कोरोना बधित आढळून आलेले आहेत. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून जिल्हय़ातील लसीकरण मोहिम ठप्प असून रविवारीही लसीकरण होणार नसल्याने जिल्हावासियांना सोमवारपर्यंत लसीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
जिह्यात कोरोना बाधित होण्याचे प्रमाण गेल्या चार दिवसांपासून वाढत गेले होते. हजाराचा आकडा होता. चार दिवसानंतर काल दिवसभरात आलेल्या बाधितांचा आकडा हा कमी झाला असून 872 जण नव्याने बाधित आढळून अले. 12 हजार 311 जणांचे स्वॅब तपासणी केले होते. त्यामुळे पॉझिटीव्हीटी रेट कमी झाल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. आलेल्या अहवालात कराड तालुका हा प्रथम क्रमांकावर असून त्यामध्ये 259 जण बाधित आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ सातारा तालुका असून 159 जण बाधित आढळून आले आहेत. दोन्ही तालुक्यामध्ये चढाओढ सुरुवातीपासून राहिलेली आहे.
कराड तालुका बाधित व मृत्यूमध्ये सर्वात पुढे
जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 872 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 20 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 38 (8871), कराड 259 (30588), खंडाळा 55 (12206), खटाव 48(20323), कोरेगांव 94 (17641), माण 38 (13593), महाबळेश्वर 10 (4379), पाटण 56 (9004), फलटण 49 (29053), सातारा 159(42059), वाई 55 (13248) व इतर 11 (1461) असे आज अखेर एकूण 202426 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे. जावली 0 (183), कराड 8 (914), खंडाळा 0 (154), खटाव 5 (480), कोरेगांव 0 (383), माण 1 (285), महाबळेश्वर 0 (84), पाटण 1 (302), फलटण 0 (477), सातारा 4 (1250), वाई 1 (305) व इतर 0 (71), असे आज अखेर जिह्यामध्ये एकूण 4888 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.