प्रतिनिधी / बेळगाव
जिव्हाळा फौंडेशनतर्फे फादर्स डेचे औचित्य साधून नावगे येथील करुणालय वृद्धाश्रमात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फौंडेशनच्या माध्यमातून वृद्धाश्रमात अन्नधान्य व मिठाईचे वाटप करण्यात आले.
अनिता रॉड्रिग्ज यांनी सर्वांचे स्वागत करून करुणालयविषयी माहिती दिली. जिव्हाळा संस्थेच्या अध्यक्षा माधुरी जाधव व उपाध्यक्षा राजश्री अनगोळ यांनी संस्थेबद्दल माहिती दिली. संस्थेच्या संस्थापिका डॉ. सविता कद्दू यांनी करुणालयला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. वृद्धाश्रमातील सर्व सदस्यांचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला.
यावेळी कोषाध्यक्षा ज्योती मिरजकर, सचिव आरती निपाणीकर, सहकोषाध्यक्षा योगिता पाटील, सहसचिव स्मिता शिंदे, सदस्य विनय पाटील, वृषभनाथ अवलक्की, श्रीनिवास गुडमट्टी, संतोष, शहाबाज जमादार, रेडेकर यांच्यासह इतर उपस्थित होते.