उपचारानंतर घरी पाठविले : एकूण बरे झालेल्यांची संख्या 208 वर
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिह्यातील आणखी 38 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ते सर्व जण अथणी, हुक्केरी, रायबाग व सौंदत्ती तालुक्मयातील आहेत. बुधवारी सिव्हिल हॉस्पिटलमधून त्यांना घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 208 वर पोहोचली आहे. दरम्यान, बुधवारी भाग्यनगर येथील एका वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बिम्स प्रशासनाने बुधवारी सायंकाळी ही माहिती दिली. 38 पैकी 37 जण बेळगाव जिह्यातील तर एक जण बागलकोट जिह्यातील आहे. अथणी, दड्डी, मणगुत्ती, कर्लकट्टी, मुन्नोळी, खवणेवाडी, कोट, हुक्केरी, रायबाग येथील 37 जणांचा यामध्ये समावेश आहे.
बेळगाव तालुक्मयातील कंग्राळी खुर्द, हंदिगनूर, सावगाव, अतिवाड, कट्टणभावी, केदनूर, मरनहोळ व वडगाव येथील 12 जणांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी दुपारी या सर्व 38 जणांना घरी पाठविण्यात आले. पुढील 14 दिवस घरातच राहण्याचा सल्ला त्यांना दिला आहे.
दरम्यान, जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 14 हजार 812 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. 3 हजार 515 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. बेळगाव जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 296 वर पोहोचली असून यापैकी 208 जण बरे झाले आहेत.
सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात 95 कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. जिह्यातील 3 हजार 379 जणांनी 14 दिवसांचे व 7 हजार 323 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले असून तपासणी वाढल्यामुळे प्रयोगशाळेत प्रलंबित स्वॅबची संख्या घटली आहे. आता केवळ 56 जणांच्या अहवालांची प्रशासनाला प्रतीक्षा आहे.
भाग्यनगर येथील वृद्धाला कोरोना
भाग्यनगर येथील एका 61 वषीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये ही माहिती दिली आहे. रुग्ण क्रमांक 5968 चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 6 जून रोजी हा 61 वषीय वृद्ध मुंबईहून बेळगावला परतला होता. कोरोनाची लक्षणे असल्याने त्याच दिवशी त्याला बिम्सला हलविण्यात आले होते. स्वॅबही तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. बुधवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.