प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आह़े रविवारी तब्बल 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा यामुळे जिह्यातील एकूण मृतांची संख्या 78 वर पोहोचली आह़े तर रविवारी 65 नवे कारोनाबाधित रूग्ण आढळूल आले आहेत़ यामुळे जिह्यातील कोरोना रूग्णांची संख्या 2 हजार 213 इतकी झाली आह़े
जिल्हा रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथील 43 वर्षीय पुरूषाचा व 70 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा तर चिपळूण तालुक्यातील झरीरोड येथील 64 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील 64 वर्षीय पुरूष, मारूती मंदिर परिसरातील 44 वर्षीय तरूणाचा रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा मागील 24 तासात 5 कोरोना रूग्ण बळी पडण्याची ही जिह्यातील पहिलीच वेळ आह़े
रविवारी नव्याने 65 कारोना रूग्ण आढळून आले आहेत़ यामध्ये रत्नागिरी 4, कामथे 44, लांजा 1, गुहागर 4, दापोली 5 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 7 कोराना रूग्ण आढळून आले आहेत़ यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 2 हजार 213 इतकी पोहोचली आह़े दरम्यान मागील 24 तासात 10 उपचारानंतर बरे रूग्णांना घरी सोडण्यात आल़े यामध्ये जिल्हा कोवीड रूग्णालयातून 8, खेड व चिपळूण येथून प्रत्येकी 1 रूग्णांना घरी सोडण्यात आल़े जिह्यात आता कोरोनापासून मुक्त झालेल्यांची संख्या 1 हजार 489 इतकी झाली आह़े
20 हजार नमुन्यांची तपासणी
जिह्यात आतापर्यंत 20 हजार 198 नमुने तपासण्यात आले आहेत़ त्यापैकी 19 हजार 494 अहवाल प्राप्त झाल़े यामधील 2 हजार 213 पॉझिटिव्ह आढळून आले तर 17 हजार 269 अहवाल निगेटिव्ह आल़े आणखी 704 अहवाल प्रलंबित आहेत़ त्यांची रत्नागिरी येथील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल़े
राज मेडिकल्सचे मालक अजय दुडये यांचे निधन
रत्नागिरी शहरातील राज मेडिकल्सचे मालक अजय दुडये यांचे रविवारी कोरोनामुळे निधन झाल़े अजय दुडये यांना काही दिवसापूर्वी कारोनाची लागण झाली होत़ी गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार करण्यात येत होत़े मात्र उपचारादरम्यान दुडये यांचे निधन झाल़े दुडये हे अतिशय प्रेमळ व मनमिळावू स्वभावाचे होत़े दुडये यांच्या निधनाबद्दल रत्नागिरी केमिस्ट असोसिएशनकडून शोक व्यक्त करण्यात आला आह़े
गुहागरमध्ये कोरोना योध्दय़ाला कोरोना
गुहागर: तालुक्यात कोरोना रुग्णांमध्ये दरदिवशी वाढत आहे. आतापर्यंत सुरक्षित राहिलेल्या प्रशासकीय यंत्रणेमध्येच कोरोनाने शिरकाव केल्याने खळबळ माजली आहे. कोरोना योद्धा पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्याची कोरोना रुग्णांची संख्या 128वर पोहोचली आहे. यामधील सध्या 36 रुग्ण ऍक्टिव्ह असून यातील 22 रुग्णांना कोविंड केअर सेंटर वेळणेश्वर येथे उपचार सुरू आहेत. चौघाजणांना घरीच उपचार सुरू आहेत. यात देवघर येथे 3 तर मोडकाघर येथे 1, कराड येथे 2, रत्नागिरी येथे 2 उपचार घेत असून कळंबोली येथे 1रुग्ण आहे. ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. तसेच गेले पाच महिने कोरोना संसर्गापासून रक्षण करणाऱया पोलीस यंत्रणेमधीलच एका पोलिसाला कोरोना झाल्याची बाब रविवारी आलेल्या अहवालातून समोर आली आहे. शहरातील मोहल्ला येथे 11 रुग्ण आहेत. शहराच्या मध्यभागी रुग्णसंख्या सहावर पोहोचली आहे. यामुळे शहरातही कोरोनाचे रुग्ण संख्या हळूहळू वाढत चालली आहे. रविवारी आलेल्या अहवालात एकूण 3 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 2 गुहागर तर जाणवले येथील आहे. यामुळे गुहागरच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती:
एकूण रूग्ण 2213
बरे झालेले रूग्ण -1489
उपचारात -646
मृत्यू 78