‘कोरोना’ चाचण्यांमध्ये वाढ, दररोज 250 चाचण्या : लक्षणे नसणाऱयांना होम आयसोलेशनचा पर्याय
एकूण रुग्णसंख्या 1833, आणखी एका रुग्णाचा मृत्यू : जिह्यात एकूण 868 जण कोरोनामुक्त
सक्रिय रुग्णांची संख्या 940
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. दररोज 250 स्वॅब चाचण्या करण्यात येत आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असल्याने लक्षणे नसणाया रुग्णांना होम आयसोलेशनचा पर्याय देण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. दरम्यान, रविवारी आणखी 76 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सावंतवाडी येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे
जिह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत असून कोरोनाग्रस्त रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्वॅब चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. दररोज 250 चाचण्या करण्यात येत असून आतापर्यंत जिह्यात 16 हजार 313 चाचण्या झाल्या आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून आतापर्यंत 868 रुग्ण बरे झाले आहेत. परंतु सक्रिय रुग्णही वाढत आहेत. सद्यस्थितीत 940 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाची लक्षणे नसणाऱया रुग्णांसाठी होम आयसोलेशनचा पर्याय ठेवला आहे. त्यासाठी स्थानिक ग्रामनियंत्रण समितीचेही सहकार्य अपेक्षित आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हय़ात आणखी 76 पॉझिटिव्ह
जिल्हय़ात रविवारी नव्याने आणखी 76 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्या 1833 झाली आहे. आणखी 19 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण 868 रुग्ण बरे झाले. जिल्हय़ात शनिवारी सावंतवाडी येथील 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 940 सक्रिय रुग्ण आहेत.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात शनिवारी विविध आजाराच्या चार व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
नवे 76 रुग्ण या गावातील
रविवारी नव्याने 76 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 31 रुग्ण असून कणकवली शहर दहा, आशिये दोन, हरकुळ खुर्द चार, शिरवल एक, फोंडाघाट तीन, कलमठ सहा, हळवल तीन, कनेडी एक, हुंबरटच्या एकाचा समावेश आहे. वेंगुर्ले तालुक्यातील 14 रुग्णांमध्ये वेंगुर्ले शहर नऊ, म्हापणच्या पाचजणांचा समावेश आहे.
सावंतवाडी तालुक्यात दहा रुग्ण असून सावंतवाडी शहर आठ, कलंबिस्त एक तर कोलगावच्या एकाचा समावेश आहे. मालवण तालुक्यात तीन रुग्ण असून कोळंब एक, मालवण एक तर भरडच्या एकाचा समावेश आहे. देवगड तालुक्यात चार रुग्ण असून देवगड शहर दोन, मिठबावच्या दोघांचा समावेश आहे. वैभववाडी तालुक्यात तीन रुग्ण वैभववाडी शहरातील आहेत. कुडाळ तालुक्यात आठ रुग्ण सापडले. त्यात कुडाळ एक, ओरोस चार, पिंगुळी एक, रानबांबुळी एक तर नेरुरच्या एकाचा समावेश आहे. दोडामार्ग तालुक्यात तीन रुग्ण सापडले. त्यात साटेली-भेडशी एक, कुडासे एक तर दोडामार्गच्या एकाचा समावेश आहे.
अ. क्र. विषय संख्या
1 एकूण अहवाल 16,313
2 पॉझिटिव्ह आलेले अहवाल 1,833
3 निगेटिव्ह आलेले अहवाल 14,191
4 प्रतीक्षेतील अहवाल 289
5 सद्यस्थितीत जिह्यातील सक्रिय रुग्ण 940
6 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 25
7 डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 868
8 विलगीकरणातील एकूण व्यक्ती 9,278
9 नागरी क्षेत्र संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्ती 4,426
10 2 मेपासून आतापर्यंत जिह्यात आलेल्या व्यक्ती 2,11,159
11 रेल्वेने जिल्हय़ात दाखल झालेले प्रवासी 4,137
12 सद्यस्थितीत सक्रिय कंटेनमेंट झोन 229