केवळ 10 ऑक्सिजन बेड शिल्लक
प्रतिनिधी/. रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर पडत आह़े शासकीय रूग्णालयांमध्ये असलेल्या 101 व्हेंटीलेटर बेडपैकी एकही बेड शिल्लक नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े तर 780 ऑक्सिजन बेडपैकी केवळ 10 बेड शुक्रवार सायंकाळपर्यंत शिल्लक होते, अशी माहिती समोर आली आह़े त्यामुळे कोरोना रूग्णांवर उपचार होणार कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आह़े
रत्नागिरी जिह्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढल्यानंतर व्हेंटीलेटर बेड व ऑक्सिजन बेडसाठी धावाधाव करण्यात आल़ी यानंतर विविध ठिकाणाहून व्हेंटीलेटरची व्यवस्था आरोग्य विभागाकडूनही करण्यात आल़ी मात्र हे व्हेंटीलेटर ऑपरेट करण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित कर्मचारी देखील नसल्याचे समोर आले आह़े त्यातच आता रूग्णांची संख्या वाढत असल्याने व्हेंटीलेटरही कमी पडू लागले आहेत़
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 304 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 51 तर आधीचे 157 असे 512 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 29 हजार 348 इतकी झाली आह़े तर मागील 24 तासांमध्ये 13 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे प्रमाण आता पुन्हा 3.2 टक्क्यांपर्यंत पोहोचले आह़े
वाढता मृत्यूदरही चिंतेत टाकणारा
रूग्णांची संख्या वाढत असतानाच मृत्यूदरही वाढणे अधिक चिंतेत टाकणारी आह़े शुक्रवारी 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े तर नव्याने तब्बल 512 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 13 मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 4, चिपळूण 2, खेड 1, संगमेश्वर 2, दापोली 1, गुहागर 2, मंडणगड 1 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा तर जिह्याचे बरे होण्याचे प्रमाण 81.52 इतके आह़े तसेच मृत्यूदर 3.03 इतका आह़े