मागील 24 तासात तब्बल 251 नवे रुग्ण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली आह़े मागील 24 तासामध्ये तब्बल 251 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल़े तर संगमेश्वरमधील 85 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आह़े मोठय़ा प्रमाणावर रुग्णांमध्ये वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आह़े तर रुग्णांसाठी बेडही उपलब्ध करण्याचे आव्हान उभे ठाकले आह़े
जिल्हा शासकीय रुग्णालायकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये तब्बल 1 हजार 179 कोरोना चाचण्या घेण्यात आल्य़ा यात आरटीपीसीआर टेस्टमध्ये 150 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 101 असे एकूण 251 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 74, दापोली 19, खेड 25, गुहागर 19, चिपळूण 45, संगमेश्वर 41, मंडणगड 2, लांजा 12 व राजापूर 14 असे रुग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 12 हजार 271 इतकी झाली आह़े तर 175 बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या आता 10 हजार 750 पर्यंत पोहोचली आह़े बरे होण्याचे प्रमाण 87.60 इतके आह़े जिह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या आता 389 इतकी झाली आह़े कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या तालुकानिहाय आकडेवारीनुसार रत्नागिरी 100, खेड 60 गुहागर 13, दापोली 41, चिपळूण 93, संगमेश्वर 43, लांजा 14, राजापूर 21, मंडणगड 4 जणांचा मृत्यू झाला आह़े जिह्यातील एकूण मृतांची संख्या 389 इतकी पोहोचली असून मृत्यूदर 3.17 इतका आह़े
एकूण रुग्ण -12271
नवे रुग्ण -251
मृत्यू -01
एकूण मृत्यू 389