प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोनाचे मंगळवारी 567 नवे रुग्ण आढळून आले आहेत़ तर 16 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता 41 हजार 196 इतकी झाली आह़े तर रुग्णांची वाढती संख्या व वाढलेल्या मृत्यूदरामुळे आरोग्य यंत्रणेच्या समोरील चिंता वाढल्या आहेत़
जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी जिह्यात 3 हजार 685 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 270 तर ऍन्टीजेन चाचणीत 297 कोरोनाबाधित रुग्ण मिळून आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 41 हजार 196 इतकी झाली आह़े जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर विविध खासगी रुग्णालयांमध्ये 10 मृत्यूंची नोंद करण्यात आली आह़े जिह्यातील एकूण मृतांची संख्या आता 1 हजार 399 इतकी झाली आह़े तर रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर हा 3.39 इतका असून पॉझिटिव्हीटी रेट 17.76 इतका आह़े