प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये शुक्रवारी नव्याने 14 कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ जिह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8 हजार 864 झाली आह़े मागील 24 तासात एकही मृत्यू झाला नसून तब्बल 28 रूग्ण कोरोनापासून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून शुक्रवारी झालेल्या 171 चाचण्यांपैकी आरटीपीसीआर चाचणीत 11 तर ऍन्टीजेन चाचणीत 3 कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 8, खेड 2, गुहागर 2, संगमेश्वर 2 असे रूग्ण आढळून आले. शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 8 हजार 351 झाली आह़े जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 94.21 पर्यंत पोचले आह़े
कोरोनाची एकूण स्थिती:
एकूण रूग्ण-8864
नवे रूग्ण -14
नवे मृत्यू – 00
एकूण मृत्यू -321