प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून शुक्रवारी केलेल्या कोरोनाच्या 268 चाचण्यांपैकी 16 नवे रुग्ण आढळून आले आहेत़ तर 13 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना उपचारानंतर घरी सोडल़े यामुळे जिह्यातील एकूण कारोना बाधितांची संख्या 8 हजार 749 इतकी झाली आह़े
जिह्यामध्ये शुक्रवारी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 6 तर ऍन्टिजेन टेस्टमध्ये 16 कारोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत़ यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 13 चिपळूण 1, लांजा 1, व संगमेश्वर 1 असे रुग्ण आढळून आले आहेत़ शुक्रवारी कोरोनापासून बरे झालेल्या 13 रुग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8 हजार 246 वर पोहोचली आह़े जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 94.25 इतके आह़े तालुकानिहाय आकडेवारीचा विचार करता रत्नागिरी सर्वाधिक 87, खेड 51, गुहागर 12, दापोली 32, चिपळूण 76, संगमेश्वर 33, लांजा 11, राजापूर 14 तर मंडणगडमध्ये 3 असे एकूण 319 जणांचा आतापर्यंत कारोनामुळे मृत्यू झाले आहेत.