प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये मंगळवारी कोरोनाचे 200 नवे रूग्ण आढळले आहेत़ रूग्णसंख्या कमी आढळून येण्यामागे कमी प्रमाणात होणाऱया चाचण्यांची संख्या असल्याचे दिसून येत आह़े नूतन जिल्हाधिकारी ड़ॉ ब़ी एऩ पाटील यांनी पदभार स्वीकारताच †िदवसाला 10 हजार चाचण्या करण्याचे लक्ष ठेवले होत़े मात्र निम्म्याही चाचण्या होत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आह़े
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या मंगळवारी आरटीपीसीआरच्या 2 हजार 529 चाचण्यांपैकी 61 तर ऍन्टीजेन टेस्टच्या 2 हजार 318 पैकी 139 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आल़े यामध्ये मंडणगड-0, दापोली-37, खेड-20, गुहागर-14, चिपळूण-56, संगमेश्वर-7, रत्नागिरी-49, लांजा-6 तर राजापूर-11 असे तालुकानिहाय रूग्ण सापडले आहेत़ जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 72 हजार 76 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 2.03 इतका आह़े
मंगळवारी 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये संगमेश्वर-1, रत्नागिरी-2, राजापूर-1 अशी तालुकानिहाय आकडेवारी आह़े तर मागील 24 तासात बरे झालेल्या 181 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 67 हजार 651 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 93.86 इतके आह़े तर 2 हजार 170 रूग्ण उपचारात दाखल करण्यात आले आहेत़ यात केवळ 408 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत़