रविवारी 18 रुग्णांची कोरोनावर मात
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून रविवारी करण्यात आलेल्या कोरोनाच्या 180 चाचण्यांपैकी 21 नवे रुग्ण आढळून आले आहेत़ तर 18 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 793 इतकी झाली आह़े
जिह्यामध्ये रविवारी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 8 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 13 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़ यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 12 चिपळूण 1, लांजा 2, दापोली 2, गुहागर 1, राजापूर 1 व संगमेश्वर 2 असे रुग्ण आढळून आले आहेत़ रविवारी कोरोनापासून बरे झालेल्या 18 रुग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8 हजार 267 वर पोहोचली आह़े जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 94.02 इतके आह़े
मृतांच्या तालुकानिहाय आकडेवारीचा विचार करता रत्नागिरी सर्वाधिक 88, खेड 51, गुहागर 12, दापोली 32, चिपळूण 76, संगमेश्वर 33, लांजा 11, राजापूर 14 तर मंडणगडमध्ये 3 अशा एकूण 320 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आह़े..