प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये गुरूवारी कोरोनाचे 67 नवे रूग्ण आढळले आहेत़ 172 बरे झालेल्या रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े जिह्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या आता कमी होत असल्याचे दिसून येत आह़े मात्र कोरोनाच्या चाचण्यांमध्ये देखील घटल्याने कोरोनाचा जिह्याला असलेला धोका कायम असल्याचे बोलले जात आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी कोरोनाच्या केवळ 2 हजार 989 चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआरच्या 1 हजार 28 चाचण्यांपैकी 27 तर ऍन्टीजेन टेस्टच्या 1 हजार 961 पैकी 40 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आल़े यामध्ये मंडणगड-3, दापोली-8, खेड-4, गुहागर-7, चिपळूण-18, संगमेश्वर-5, रत्नागिरी-14, लांजा-1 तर राजापूर-7 असे तालुकानिहाय रूग्ण सापडले आहेत़ जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 77 हजार 384 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 2.63 इतका आह़े
त्रविवारी 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये खेड-1, चिपळूण-2, संगमेश्वर-1, रत्नागिरी-1, अशी तालुकानिहाय आकडेवारी आह़े तर मागील 24 तासात बरे झालेल्या 172 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 74 हजार 79 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 95.83 इतके आह़े तर 757 रूग्ण उपचारात दाखल करण्यात आले आहेत़ यामध्ये केवळ 346 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़F