प्रतिनि/ रत्नागिरी
शुक्रवारी जिह्यामध्ये कोरोनाचे 67 नवे रूग्ण आढळले असून बरे झालेल्या 50 रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े जिह्यात कोरोनामुळे 3 मृत्यू झाले असून त्यामध्ये चिपळूण येथील 2 तर रत्नागिरीतील एकाचा समावेश आह़े मागील काही दिवस मृतांच्या व उपचारातील रूग्णसंख्येत मोठी घट नोंदली गेली आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी एकूण 3 हजार 415 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआरच्या 1 हजार 170 चाचण्यांपैकी 27 तर ऍन्टीजेनच्या 2 हजार 245 पैकी 40 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आल़े यामध्ये मंडणगड 3, दापोली 8, खेड 5, गुहागर 6, चिपळूण 21, संगमेश्वर 12, रत्नागिरी 8, लांजा 1 तर राजापूर तालुक्यात 3 रूग्ण वाढले आहेत़ यामुळे जिह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 77 हजार 246 झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टनुसार जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 2.31 आह़े
शुक्रवारी बरे झालेल्या 50 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या 73 हजार 648 व प्रमाण 95.34 झाले आह़े सद्यास्थितीत 1 हजार 37 रूग्ण उपचारात दाखल असून यामध्ये केवळ 378 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़
आरटीपीसीआर चाचण्या पूर्वपदावर
जिल्हा शासकीय रूग्णालय येथे आरटीपीसीआर चाचण्यांसाठी नियुक्त कंत्राटी कर्मचाऱयांना कमी करण्यात आले होत़े यामुळे आरटीपीसीआर चाचण्या दोन ते तीन दिवस ठप्प होत्य़ा मात्र पुन्हा कर्मचारी नेमून आरटीपीसीआर चाचण्या पूर्वपदावर आणल्याची माहिती जिल्हा रूग्णालयाकडून देण्यात आली आह़े