रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक कोरोनाबाधित
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीत कोरोनाबाधितांची संख्या आता 22 हजार 283 इतकी झाली आह़े मागील काही दिवसांमध्ये जिह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आह़े शुक्रवारी जिह्यात तब्बल 588 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल़े तर 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 304 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये केवळ 284 अशा एकूण 588 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आल़ी यात रत्नागिरी तालुक्यात 167, दापोली 50, खेड 44, गुहागर 91, चिपळूण 88, संगमेश्वर 54, मंडणगड 6, लांजा 34 व राजापूर 54 असे रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्या रूग्णसंख्या आता 22 हजार 283 इतकी झाली आह़े
जिह्यात नव्याने 16 मृत्यूंची नोंद करण्यात आल़ी यामध्ये मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 4, संगमेश्वर तालुक्यातील 1, चिपळूण 4, राजापूर 1, गुहागर 1, खेड 1, मंडणगड 1, लांजात 3 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा जिह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या तालुकानिहाय आकडेवारीनुसार रत्नागिरी 167, खेड 82, गुहागर 28, दापोली 63, चिपळूण 132, संगमेश्वर 96, लांजा 34, राजापूर 47, मंडणगड 7 अशी नोंद आहे. जिह्यातील एकूण मृतांची संख्या 656 इतकी पोहोचली असून मृत्यूदर 2.94 इतका आह़े