सातारा/ प्रतिनिधी
जिल्हय़ात ऑगस्ट आणि आता सप्टेंबरमध्ये कोरोनाचा कहर प्रचंड वाढला. यामध्ये सातारा, कराडसह सर्व जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 19 हजारांच्या उंबरठय़ावर उभी असून रविवारी रात्रीच्या अहवालात बाधितांची संख्या कमी आल्याने दिलासा मिळाला. मात्र रात्री उशिरा येत असलेल्या अहवालांचा धसका लोकांनी घेतलाय. कोरोना वाढीचे सत्र थांबावे व जिल्हा कोरोनामुक्त व्हावा म्हणून मग लोकच स्वयंस्फुर्तीने लॉकडाऊन करुन घेवू लागले आहेत. कोठूनतरी संसर्ग साखळी लवकर तुटावी हीच प्रार्थना सर्वजण करत असले तरी 25 कोरोना बळींनी चिंता वाढवली असून वाढता मृत्यूदर व वाढती बाधितांची संख्या याचे आव्हान जिल्हय़ापुढे आहेच.
दरम्यान, रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात 498 जणांचा अहवाल बाधित आला आहे. तर सोमवारी अहवालात 25 जणांचा कोरोना बळी गेला असल्याची माहिती देण्यात आलीय. कोराना बळींची एकूण संख्या 513 झाली असून शुक्रवारी 25 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सायंकाळी 252 एवढय़ा जणांनी कोरोनावर मात केली असून रात्री उशिरा अहवालात … एवढय़ा जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्हय़ात 25 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय सातारा येथे भरतगाव 65 वर्षीय पुरुष, कुडाळ, ता. जावली 76 वर्षीय पुरुष, उंब्रज ता. कराड 60 वर्षीय महिला, वडूज ता. खटाव 65 वर्षीय पुरुष, इस्लामपूर 80 वर्षीय पुरुष, ढोरगल्ली 70 वर्षीय महिला, विद्यानगर कराड 67 वर्षीय पुरुष, पुसेगाव ता. खटाव 43 वर्षीय पुरुष, वेण्णानगर 55 वर्षीय महिला, वाठार किरोली, ता. कोरेगाव 70 वर्षीय महिला, कोंडवे ता. सातारा 40 वर्षीय पुरुष, खावली, ता. सातारा 70 वर्षीय महिला. विविध खासगी रुग्णालयातील भांडवली ता. माण 70 वर्षीय पुरुष, उंचीठाणे, ता. खटाव 65 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड 57 वर्षीय महिला, सैदापूर कराड 76 वर्षीय पुरुष, रेठरे ता. कराड 69 वर्षीय महिला, सोमवार पेठ 72 वर्षीय महिला, कोळकी ता. फलटण 54 वर्षीय पुरुष, करंजे पेठ 58 वर्षीय महिला, एमआयडीसी सातारा 90 वर्षीय महिला, आसरे ता. वाई 78 वर्षीय महिला, कासेगाव 72 वर्षीय महिला, पांडे ता. वाई 65 वर्षीय महिला, मंगळवार पेठ 86 वर्षीय पुरुष असे एकूण 24 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
जिह्यातील 252 जणांची कोरोना वर मात
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 252 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे यामुळे कोरोना मुक्ती 11 हजाराच्या पार गेली असून एकूण कोरोना मुक्तांची संख्या 11029 एवढी झाली असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.
जिल्हा बँकेत 25 बाधित
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा परिषदेचे समोरील मुख्य शाखेत अधिकायांसह 25 कर्मचारी बाधित आली असून या सर्वांवर उपचार सुरु आहेत त्यातील काहींना होम आयसोलेट केले आहे. यामुळे जिल्हा बँकेत काळजी घेण्यात येऊ लागले असून जिल्हाधिकारी कार्यालयात देखील सहाजणांचे अहवाल बाधित आले असल्याने आवश्यक त्यांनीच काम असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयात यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.