बरे होण्याचे प्रमाण 96.13 वर, -नव्याने 89 रुग्ण, 2 मृत्यू
जिह्यामध्ये कोरोनापासून बरे होण्याचे प्रमाण 96.13 टक्क्यांवर पोहोचले आह़े मागील काही दिवसांपासून रुग्णामंध्ये घट दिसत आह़े बरे होणारी रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आह़े मंगळवारी सायंकाळपर्यंत उपचारातील रुग्णांची संख्या 598 इतकी असून नव्याने जिह्यात 89 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आह़े तर 2 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी कोरोनाच्या केवळ 2 हजार 579 चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआरच्या 581 चाचण्यांपैकी 26 तर ऍन्टिजेन टेस्टच्या 1 हजार 998 पैकी 63 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळल़े यामध्ये मंडणगड-8, दापोली-14, खेड-7, गुहागर-4, चिपळूण-19, संगमेश्वर-6 रत्नागिरी-22, लांजा-6 तर राजापूर-3 असे तालुकानिहाय रुग्ण सापडले. जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 77 हजार 508 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 3.10 इतका आह़े तर मंगळवारी रत्नागिरी व खेडमधील प्रत्येकी एकाची उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद आह़े मागील 24 तासात बरे झालेल्या 139 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 74 हजार 363 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 96.13 इतके आह़े तर 598 रुग्ण उपचारात दाखल केले आहेत़ यामध्ये केवळ 241 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़