प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यातील कोरोना बळींच्या संख्येत रविवारी आणखी एकाने वाढ झाल़ी तालुक्यातील कापडगाव येथील 78 वर्षीय महिलेचा जिल्हा कोविड रूग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा यामुळे जिह्यातील कोरोना बळींची सख्या आता 61 वर पोहोचली आह़े तर रत्नागिरी तालुक्यातील कोरोना बळींचा आकडा 15 वर पोहोचला आह़े
समाधानाची बाब म्हणजे जिह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढताना दिसून येत आह़े रविवारी बरे झालेल्या 47 रूग्णांना घरी सोडण्यात आल़े. यामध्ये को†िवड रूग्णालय रत्नागिरी येथून 11, समाजकल्याण येथून 11, दापोलीमधून 1, पेढांबेमधून 12, कोवीड सेंटर घरडा येथून 12 बरे झालेल्या रूग्णांचा समावेश आह़े
खेडमध्ये आणखी 13 कोरोनाबाधित
खेड: शनिवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी 13जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शहरातील एकासह घाणेखुंट 4, पुरे खुर्दतील 2, आवाशी, भरणे, भडगाव, पिरलोटेतील प्रत्येकी 1, तर विनती वसाहतीतील 2 रूग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत.
दापोलीत कोरोनाचे 3 रूग्ण
मौजे दापोली: दापोलीत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे सध्या दापोलीतील रुग्णांच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. दापोली तालुक्यातून एकूण 31 अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी शनिवारी बुरोंडी येथील दोन आणि दाभोळ येथील एक अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दापोली तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
राजापुरातील खासगी डॉक्टरला कोरोनाची लागण
राजापूर: शनिवारी रात्री आलेल्या तपासणी अहवालानुसार, राजापूर शहरातील एका खासगी डॉक्टरचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 71 झाली आहे. संबंधित डॉक्टरला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पत्नी व दोन मुलांना रायपाटण येथील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येणार असून तेथे स्वॅब घेण्यात येणार आहेत. या डॉक्टरकडे गेल्या काही दिवसांमध्ये अनेक रूग्ण तपासणीसाठी गेलेले असल्याने त्यांचा शोध घेण्याची कामगिरी आरोग्य विभागामार्फत सुरू आहे. दरम्यान तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 71 झाली असून यापैकी 59 जण उपचाराअंती बरे झाले आहेत. आता केवळ 8 जण उपचार घेत आहेत. तर मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या 4 आहे.