नवे 35 रूग्ण, 2 मृत्यू : बरे होण्याचे प्रमाण नव्वद टक्कयांजवळ
प्रतिनिधी / रत्नागिरी
जिह्यात कोराना चाचण्यांच्या प्रमाणात व रूग्ण संख्येतही घट होत आह़े सोमवारी जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून झालेल्या 138 काराना चाचण्यात 35 जणाना कारोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आह़े एकूण रूग्णसंख्या 8 हजार 39 झाली असून दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी कारोनापासून बरे झालेल्या 48 रूग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे कारोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 7 हजार 165 झाली आह़े जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण वाढून 89.12 वर गेले आह़े सोमवारी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 10 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 25 कारोनाबाधित आढळून आले आहेत़ यामध्ये रत्नागिरी 8, चिपळूण 5, गुहागर 4, लांजा 3, खेड 7, मंडणगड 1, दापोली 4 व राजापूर 3 अशी तालुकानिहाय संख्या आह़े
सोमवारी 2 कारोना रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा जिह्यातील कारोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 295 तर जिह्यातील मृत्यूदर 3.66 झाला आह़े गुरूवारी झालेल्या मृत्यूमध्ये चिपळूण येथील 73 वर्षीय महिला व 63 वर्षीय पुरूषाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून देण्यात आली आह़े रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 79, खेड 49, गुहागर 11, दापोली 31, चिपळूण 71, संगमेश्वर 30, लांजा 10, राजापूर 12 तर मंडणगडमध्ये 2 अशा एकूण 295 जणांचा आतापर्यंत कारोनामुळे मृत्यू झाला आह़े
एकूण रूग्ण-8039
नवे रूग्ण -35
नवे मृत्यू -02
एकूण मृत्यू -295