18 हजार कोरोना योध्दांना लसीकरण,
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ात बाधित वाढ मंदावलेली असली तरी अधून-मधून त्यात अल्प चढउतार सुरुच आहे. यामध्ये आरोग्य कर्मचाऱयांसह प्रंटवर लढणाऱया महसूल, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी, कर्मचाऱयांना लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत जिल्हय़ात एकूण 18 हजार 705 जणांचे लसीकरण पूर्ण झाले असून यामध्ये कोणालाही रिऍक्शन वा त्रास झालेला नाही. लसीकरण सुरळीत सुरु असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली.
पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचाऱयांना लसीकरण सुरु करण्यात आले. यामध्ये आरंभी लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यात वेळ गेला. मात्र, लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम समोर न आल्याने लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. शासकीय आरोग्य कर्मचाऱयांबरोबरच खासगी हॉस्पिटल्समधील डॉक्टर्स, आरोग्य सेवक, नर्सेस यांना देखील लसीकरण सुरु करण्यात आले आहे. तर महसूल व पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱयांना लसीकरण करण्यात येत आहे.
आतापर्यंत जिल्हय़ातील 18 हजार 705 जणांना लसीकरण करण्यात आले असून यामध्ये आरोग्य विभागासह प्रंटवरील महसूल, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱयांचा सहभाग आहे. यामध्ये 24 लसीकरण केंद्रावर हे लसीकरण सुरु आहे. सातारा विभागासाठी जिल्हा रुग्णालय, आर्यांग्ल हॉस्पिलट, सातारा, गोडोली आरोग्य केंद्र, कस्तुरबा आरोग्य केंद्र, सातारा व आन्को लाईफ कॅन्सर सेंटर, कराड विभागात उपजिल्हा रुग्णालय, कराड, कृष्णा हॉस्पिटल, सहय़ाद्री हॉस्पिटल व श्रध्दा हॉस्पिटल येथे लसीकरण सुरु आहे.
फलटण तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालय फलटण, पाटण तालुक्यात पाटण व ढेबेवाडी येथे, कोरेगाव येथे आरएच कोरेगाव व श्रीरंग नर्सिंग होम, माणमध्ये आरएच दहिवडी, खंडाळय़ात आरएच खंडाळा, वाईला मिशन हॉस्पिटल वाई, घोटवडेकर हॉस्पिटल, खटाव तालुक्यात मायणी मेडिकल कॉलेज, आरएच वडूज तर महाबळेश्वरात आरएच महाबळेश्वर व जावलीत आरएच जावली येथे लसीकरण सुरु असल्याचे डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.
लसीकरण अंतिम टप्यात…
आरोग्य विभाग, पोलीस, महसूल व स्थानिक स्वराज्य संस्थामधील प्रंटवरील अधिकारी, कर्मचारी असे मिळून एकूण 20 हजार 400 जणांना लसीकरण करण्याय येणार आहे. पहिल्या टप्प्यातील ही लसीकरण मोहिम 86 टक्के झाली असून लसीकरण मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. काही महिन्यानंतर या सर्वांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. सध्या आरोग्य विभाग बाधितांवर उपचार व लसीकरण मोहीम अशा दोन्ही पातळीवर काम करत आहे.