प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये गांजा विक्रीविरोधात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वषण शाखेकडून धडक कारवाई करण्यात आल़ी रत्नागिरी-हातखंबा येथे खासगी बसमध्ये तर खेड तालुक्यातील भोस्ते येथे ही कारवाई करण्यात आल़ी यावेळी पोलिसांनी दोन किलो 942 ग्रॅम गांजा हस्तगत केला असून खासगी बससह सुमारे 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आह़े तसेच देवरूखातही खुलेआम गांजा बाळगणाऱया तरुणाला गांजा व अंमली पदार्थांसह देवरूख पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली. यामध्ये बसचे चालक महादेव लक्ष्मण धवळगी (35, भटवाडी-लांजा) व प्रतिक हरिश्चंद्र मयेकर (24, राजापूर) तसेच मासुम मुनावर कालवे (23, भोस्ते, जसनाईक मोहल्ला, खेड) आणि संतोष अशोक मिरजकर (42) या चौघांचा समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते राजापूर जाणाऱया खासगी बसमधून (एमएच-01-एसी-4278) गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला प्राप्त झाली होत़ी त्यानुसार शुक्रवारी सकाळी हातखंबा तिठा येथे बस थांबवून तपासणी केली असता ड्रायव्हरच्या केबीनमध्ये सॅकमध्ये सुमारे 41 हजार रूपये किंमतीचा 2 किलो 139 ग्रॅम गांजा पोलिसांना सापडला.
गांजाची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी बसचे चालक महादेव धवळगी व प्रतिक मयेकर या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आह़े खासगी बससह 14 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आह़े दोघाही संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
17 डिसेंबर रोजी खेड तालुक्यातील भोस्ते गावात जलालशहा मोहल्ला परिसरात एक व्यक्ती गांजा विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला प्राप्त झाली होत़ी त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्यावतीने सापळा रचला होत़ा जलालशहा मोहल्ला येथील रेल्वे बोगद्याकडे जाणाऱया रस्त्यावर मासुम कालवे याच्या ताब्यातून 16 हजार रुपये किंमतीचा 803 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात मासुम याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाकडून त्याला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आह़े गुन्ह्रय़ाचा तपास स.पो.नि. सुजित गडदे करीत आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात आलेल्या दोन्ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक शहा, उपनिरीक्षक विकास चव्हाण, हवालदार संजय कांबळे, संदीप कोळंबेकर, सुभाष भागणे, शांताराम झोरे, नितीन डोमणे, राकेश बागुल, मिलिंद कदम, अरुण चाळके, प्रशांत बोरकर, संजय जाधव, पोलीस नाईक अमोल भोसले, विजय आंबेकर, बाळु पालकर, सागर साळवी, सत्यजित दरेकर यांनी केल़ी
देवरूखात 15 छोटय़ा गांजाच्या पुडय़ा सापडल्या
देवरूख शहरातील मच्छी मार्केटजवळच्या परिसरात खुलेआम गांजा बाळगणाऱया तरुणाला गांजा व अमली पदार्थांसह देवरूख पोलिसांनी अटक केली. संतोष अशोक मिरजकर (42) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. या बाबत देवरूख पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची खबर पोलीस हवालदार सचिन भुजबळराव यांनी पोलीस ठाण्यात दिली. मिळालेल्या माहितीवरुन देवरूख पोलिसांनी या परिसरात गस्त घातली असता त्यांना भगव्या रंगाच्या कापडी पिशवीत एक तरूण गांजा व अंमली पदार्थ घेऊन वावरत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडील पिशवी ताब्यात घेतली असता त्यातून 15 छोटय़ा गांजाच्या पुडय़ा सापडल्या. याचे बाजारीमूल्य 2250 रूपये इतके आहे. यावरून गांजा व अंमली वनस्पती गैरवापर कायद्यान्वये त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यात आली.