प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोनाचे 623 नवे रूग्ण आढळून आले असून जिह्यातील कोरोनाग्रस्यांची एकूण संख्या 45 हजार 936 झाली आहे. बुधवारी 16 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े यामुळे जिह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यची संख्या 1 हजार 561 झाली आह़े मंगळवारी 5 हजार 525 कोरोना चाचण्या झाल्या, त्या तुलनेत चाचण्यांमध्ये बुधवारी सुमारे 500 ने घट झाली.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी जिह्यात 4 हजार 993 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत 335 तर ऍन्टीजेन चाचणीत 185 असे एकूण 520 व त्यापूर्वीचे 103 असे एकूण 623 कोरोनाबाधीत आढळले. मागील 24 तासांमध्ये 8 तर यापूर्विच्या 8 कोरोनाबाधितांची नोंद बुधवारी करण्यात आली आह़े यामुळे जिह्यातील कोरोनाबळींची संख्या दीड हजारापार गेली आह़े जिह्याचा मृत्यूदर 3.39 झाला असून पॉझिटिव्हीटी रेट 17.05 आह़े