प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यातील संगमेश्वर तालुक्यात कोरोना डेल्टा प्लसचे आणखी 2 रूग्ण आढळून आले आहेत़ डेल्टा प्लस विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने जिह्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका वाढला आह़े यामुळे नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे अत्यावश्यक ठरणार आह़े दरम्यान सोमवारी जिल्हय़ामध्ये कोरोनाचे नव्याने 115 रूग्ण आढळून आले तर 3 जणांचा मृत्यू झाला आह़े
संगमेश्वर मध्ये आढळून आलेले डेल्टा प्लसचे दोन्ही रूग्ण पुरूष आहेत़ त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा रूग्णालयाकडून सांगण्यात आले आह़े यापूर्वी देखील संगमेश्वर तालुक्यात डेल्टा प्लसचे 10 रूग्ण आढळून आले होत़े यानंतर जिह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झाला होत़ा डेल्टा प्लसचे दोन रूग्ण आढळल्याने अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता मांडली जात आह़े नागरिकांनी बेफिकिरी दाखवल्यास पुन्हा एकदा कठोर निर्बंध लादण्याची वेळ रत्नागिरीकरांवर येण्याची शक्यता आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी कोरोनाच्या केवळ 5 हजार 658 चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआरच्या 4 हजार 65 चाचण्यांपैकी 78 तर ऍन्टीजेनच्या 1 हजार 593 पैकी 37 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आल़े यामध्ये मंडणगड 1, दापोली 8, खेड 7, गुहागर 7, चिपळूण 7, संगमेश्वर 19, रत्नागिरी 54, लांजा 6 तर राजापूर तालुक्यात 6 नवे रूग्ण आढलले आहेत़ यामुळे जिह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 73 हजार 148 झाली आह़े आरटीपीसीआर चाचणीचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 1.91 झाला आह़े
उपचारादरम्यान 3 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये मंगणगड, खेड व चिपळूण तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आह़े मागील 24 तासात बरे झालेल्या 258 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. बरे झालेल्यांची एकूण संख्या 66 हजार 134 व प्रमाण 94.51 झाले आह़े सद्यस्थितीत 1 हजार 763 रूग्ण उपचाराखाली दाखल आहेत. यामध्ये केवळ 381 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत़