एकाच दिवशी रुग्णांच्या वाढत्या संख्येने पुन्हा धास्ती वाढली
प्रतिनिधी / बेळगाव
दररोज कोरोनाची किती जणांना बाधा झाली याकडेच अधिक लक्ष दिले जात आहे. राज्य सरकारच्या हेल्थ बुलेटीननुसार जिह्यामध्ये मंगळवारी 51 जण आढळले. त्यामध्ये बेळगाव तालुक्मयात तब्बल 33 जणांचा समावेश आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्मयाला मोठा दणका बसला आहे. मुंबई, पुणे कनेक्शन असले तरी पहिल्यांदाच इतका मोठा आकडा सामोरा आला आहे. यामुळे पुन्हा धास्ती वाढली असून आरोग्य विभाग पुन्हा जोमाने कामाला लागले आहे.
परराज्यातून आलेल्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. मात्र क्वारंटाईनमध्ये असलेले निम्याहून अधिक जण कोरोना पॉझिटिव्ह निघू लागले आहेत. यामुळे क्वारंटाईनमध्ये असलेल्यांच्या मनामध्येही भिती वाढु लागली आहे. एक दिवसांपूर्वीच अधिक रुग्ण सापडण्याची शक्मयता आरोग्य विभागाने व्यक्त केली होती. अनेक जण संशयित असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मंगळवारच्या हेल्थ बुलेटीनकडे आरोग्य विभागासह साऱयांचेच लक्ष लागले होते.
मंगळवारी जिह्यामध्ये 51 जण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे जिह्याचा कोरोना बाधितांचा आकडा 211 वर पोहोचला आहे. बेळगाव तालुक्मयात तब्बल 33 जण सापडले आहेत. यामध्ये सर्वात जास्त अतिवाडमध्ये रुग्ण आढळले आहेत. अतिवाड 15, मुतगा 2, सांबरा 1, सावगांव 1, उचगाव 3, हिंडलगा-सुळगा 2, हंदिगनूर 1, मार्कंडेयनगर 1, नेहरुनगर 1, भेंडीगेरी 1, बाळेकुंद्री खुर्द 1, बाळेकुंद्री बुद्रुक 1, याचबरोबर शहरामध्ये 3 असे रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.
परराज्यातून येणाऱयांची संख्या वाढत चालली आहे. हा आकडा जसा वाढेल तशी कोरोना बाधितांची संख्या वाढु लागली आहे. बेळगाव तालुक्मयात 1 हजारांच्या आसपास क्वारंटाईन म्हणून नागरिकांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये आता 33 रुग्ण तालुक्मयात आढळले आहेत. मुंबई, पुणे, धारवा, बेंगळूर येथून येणाऱयांची संख्या अधिक आहे. त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. मुंबई, पुणेमधून आलेल्यांना सर्वात जास्त कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
रुग्ण क्रमांक 3668, 3669, 3670, 3671, 3672, 3673, 3675, 3676, 3677, 3678, 3679, 3680, 3681, 36832, 3683, 3684, 3685, 3686, 3687, 3688, 3689, 3690, 3691, 3692 यासह जिह्यात 51 जण कोरोना बाधित आढळले आहेत. राज्यात मंगळवारी तब्बल 388 जण नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यात 3 हजार 796 कोरोना बाधितांचा आकडा झाला आहे.
बेळगाव जिह्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी 51 जण सापडले आहेत. त्यामुळे बेळगाव जिह्याचा आकडाही 211 वर पोहोचला आहे. अजूनही काही जणांचा अहवाल यायचा असून आता त्यामध्येही कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्मयता नाकारता येत नाही.
जिह्यात आतापर्यंत 117 जण कोरोनामुक्त
मंगळवारी 51 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. मात्र 9 जण बरेही झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होण्याचा आकडा 117 वर पोहोचला आहे. तर 93 जणांवर उपचार सुरु आहेत. जिह्यामध्ये कोरोनापासून मुक्त होणाऱयांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे भितीचे सध्या तरी काहीच कारण नाही. मंगळवारी 9 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधून घरी जावू देण्यात आले आहे.