प्रतिनिधी / सातारा
जिह्यात तीन ठिकाणी दारू अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी 9 हजार 708 रुपयांची देशी, विदेशी दारूच्या बाटल्या व रोख रक्कम हस्तगत केली. याप्रकरणी संशयितांना सीआरपीसी अन्वये नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत.
पोलिसांनी विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये वराडे, ता. कराड गावच्या हद्दीत महेंद्र नामदेव शिंदे (वय 30, रा. वराडे, ता. कराड) याच्याकडून 920 रुपयांच्या 10 देशी दारूच्या बाटल्या, कोडोली, ता. सातारा येथे अभिषेक गुलाब हावळे (वय 20, रा. धनगरवाडी, कोडोली, सातारा) याच्याकडून 3 हजार 588 रुपयांच्या विदेशी दारूच्या 44 बाटल्या व रोख रक्कम हस्तगत केली. तर मेढा पोलिसांनी पानस, ता. जावली येथे पाटील धाब्याच्या पाठीमागील बाजूस प्रवीण भिमराव गुजर (वय 38, रा. पानस आणि स्वप्नील विठ्ठल गावडे (वय 26, रा. आखेगणी, ता. जावली) यांच्याकडून 5 हजार 200 रुपयांच्या विदेशी दारूच्या 10 बाटल्या व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.