साडेनऊ हजारांची रोख रक्कम हस्तगत : चारजणांवर कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
पोलिसांनी सातारा जिह्यातील शिरवळ, सातारा व वाई येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या जुगार अड्डय़ांवर छापा टाकून 9 हजार 549 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी याप्रकरणी चारजणांवर कारवाई केली तिघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीत आझाद जनरल किराणा स्टोअर्स दुकानासमोरील एका बोळामध्ये ज्ञानेश्वर बाबुराव कर्वे (वय 55, रा. पळशी, ता. खंडाळा) हे जुगार घेताना आढळून आले. त्याच्याकडून 2 हजार 852 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
दुसऱया घटनेत कोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीत आयसीआयसीआय बँक एटीएमच्या आडोशाला जितेंद्र राजमल शहा (वय 56, रा. कोडोली, ता. सातारा), समीर कच्छी (रा. मोळाचा ओढा, ता. सातारा) हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 5 हजार 595 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.
तिसऱया घटनेत वाई येथील जनता अर्बन बँकेच्या समोर असलेल्या चिकन सेंटरच्या आडोशाला जमील मुनीर शेख (वय 66, रा. सोनगिरवाडी, ता. वाई) हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 1 हजार 102 रुपयांची रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.