13 दुचाकी वाहने जप्त, हुक्केरी पोलिसांची मोठी कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
संपूर्ण जिह्यामधून मोटार सायकली चोरुन पोलिसांची झोप उडविणाऱ्या त्रिकुटाला हुक्केरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे दुचाकी चोरणाऱया एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
हुक्केरीचे पोलीस निरीक्षक गुरुराज जी. कल्याणशेट्टी यांनी ही कारवाई केली आहे. शनिवार दि. 24 रोजी रात्री कल्याणशेट्टी हे गस्त घालत असताना प्लेट क्रमांक नसलेल्या दुचाकीवरुन दोघेजण संशयितरित्या फिरत होते. यावेळी पोलीस निरीक्षक कल्याणशेट्टी यांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
दाऊत खुदासाब सरकावास (रा. चिम्मड, ता. जमखंडी), महेश बसाप्पा मगदूम (सध्या रा. कल्लोळी, मुळ गाव सावळगी) अशी आरोपींची नावे आहेत. हुक्केरीचे पोलीस उपनिरीक्षक शिवानंद गुडगनट्टी यांनी त्यानंतर तपासाची चपे फिरविली. या दोघांकडे सापडलेली पल्सर मोटार सायकल ही यलीमुनवळ्ळी येथून 1 ऑक्टोबर 2020 रोजी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या दोघांची कसून चौकशी केली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला.
त्यानंतर या दोघांची अधिक चौकशी केली असता या प्रकरणात शिवानंद महादेव चौगुला (मुळचा रा. बेंडवाड, सध्या रा. गांधीनगर, हुक्केरी) याचाही सहभाग असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यालाही ताब्यात घेवून त्याचीही चौकशी करण्यात आली.
हुक्केरी येथे 2, बेळगाव माळमारुती येथे 1, जमखंडी 1, गोकाक शहर 2, नेसरगी पोलीस स्थानकाच्या हद्दीत 1, गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत 2, घटप्रभा पोलीस स्थानकाच्याहद्दीत 2, हारुगेरी क्रॉसजवळ 1 आणि सौंदत्ती पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱया मल्लूर येथून 1 अशा एकूण 13 मोटार सायकली चोरल्याची कबुली त्यांनी दिली.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, हुक्केरीचे मंडल पोलीस निरीक्षक मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, यमकनमर्डीचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, टी. बी. नेर्ली, आर. आर. गिड्डप्पगोळ, विठ्ठल नाईक, अजित चिकोडी, महेश करगुप्पी, एल. वाय. किलार्गी, मैलार बेन्ने, मंजुनाथ सादी, अजित नाईक, मुसा अब्बार आदीं पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.