प्रतिनिधी/ सातारा
जिह्यात पाच देशी दारूच्या अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी 11 हजार 600 रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण, ता. फलटण येथील मंगळवार पेठेत असणाया बर्फ कारखान्याच्या पाठीमागे भिंतीलगत तेथीलच कुंदन नारायण अहिवळे त्याच्याकडून 900 रुपयांची दहा लिटर हातभट्टीची दारू हस्तगत करण्यात आली. शेणोली, ता. कराड येथे तेथीलच मारुती होसमने याच्याकडून 1800 रुपये देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. अपशिंगे, ता. सातारा गावच्या हद्दीत घराच्या आडोशाला तेथीलच हरिदास रामचंद्र राठोड यांच्याकडून 1200 रुपये , धुमाळवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत बगीचा मळा येथे तेथीलच महेंद्र संपत शिरतोडे याच्याकडून 900 रुपये, गोकुल, ता. पाटण गावच्या हद्दीत आनंदा दाजी चव्हाण रा. कोयनानगर, ता. पाटण याच्याकडून 832 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.
उंडाळे, ता. कराड गावच्या हद्दीत पोपट शिवाजी मोरे रा. ओंड, ता. कराड याच्याकडून 3200 रुपये, उपळवे, ता. फलटण गावच्या हद्दीत तेथीलच भाऊसो पांडुरंग फडतरे याच्याकडून 960, रेठरे बुद्रुक, ता. कराड गावच्या हद्दीत विकास सेवा सोसायटीच्या आडोशाला तेथीलच नाथा राजाराम सकटे याच्याकडून 1032 रूपये, सातसर्कल साखरवाडी, ता. फलटण येथे तेथीलच मिलिंद प्रल्हाद अहिवळे याच्याकडून 676 रुपये किमतीची देशी दारू हस्तगत करण्यात आली.