प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात शुक्रवारी कोरोना रूग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल़ी एकाच दिवसात तब्बल 522 कोरोना रुग्ण आढळून आले असून 8 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा मृतांमध्ये 6 जण रत्नागिरी तालुक्यातील आहेत़ वाढत्या रूग्णसंख्येमुळे कोवीड रूग्णालयांवर भार वाढत असून अनेकांना बेडसाठी तासंतास वाट पहावी लागत आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून प्राप्त माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये आरटीपीसीआर चाचणीत 317 तर ऍन्टीजेन चाचणीत 205 असे तब्बल 522 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये चिपळूण तालुक्यात 125, रत्नागिरी 124, संगमेश्वर 99, खेड 36, गुहागर 63, दापोली 55, लांजा 16, राजापूर 3 तर मंडणगड तालुक्यात 1 असे रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील कोरोनाची रूग्णांची एकूण संख्या 14 हजार 560 झाली आह़े
मागील 24 तासांत 8 कोरोना रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आह़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 70 वर्षीय महिला, 88 वर्षीय पुरूष, 59 वर्षीय पुरूष, 65 वर्षीय पुरूष, 45 व 80 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आह़े याबरोबरच लांजा तालुक्यातील 80 वर्षीय पुरूष व गुहागर येथील 65 वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा जिह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 429 व मृत्यूदर 2.94 झाला आह़े जिह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.90 टक्के झाले आहे.
शिर्के हायस्कूल आता कोरोना तपासणी केंद्र
रत्नागिरीतील महिला रुग्णालय कोविड सेंटर येथील कोरोना तपासणी केंद्र माळनाका येथील शिर्के हायस्कूलमध्ये सुरु करण्यात आले आहे. महिला रुग्णालय पूर्णपणे कोविड रुग्णांवर उपचारासाठीच वापरण्यात येणार आहे. यामुळे कोरोना चाचणीसाठी महिला रुग्णालयाऐवजी शिर्के हायस्कूल येथे जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्य तपासणी केंद्रे नेहमीप्रमाणे कार्यरत राहणार आहेत.