रत्नागिरी
कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. बुधवारी जिल्हय़ात 156 नवे बाधित रुग्ण सापडल़े त्यामुळे जिह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 69 हजार 115 इतकी झाली आह़े तर 694 रुग्णांनी कोरोनावर मात केली आह़े त्यामुळे आजपर्यंत जिह्यात 64 हजार 515 रुग्ण बरे झाले आहेत़ बुधवारी 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा त्यामुळे आतापर्यंत 1 हजार 973 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बुधवारी आरटीपीआर चाचणीमध्ये 57 तर रॅपिड अँन्टीजन चाचणीमध्ये 99 रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल़ी आरटीपीआर चाचणीमध्ये मंडणगड, दापोलीमध्ये प्रत्येकी 1, गुहागर राजापूर प्रत्येकी 2, चिपळूण 19, संगमेश्वर 6, रत्नागिरी 26, असे एकूण 57 रुग्ण सापडले तर रॅपिड अंान्टीजन चाचणीमध्ये दापोली 12, खेड 20, गुहागर 7, चिपळूण 18, संगमेश्वर 4, रत्नागिरी 28, लांजा 3 तर राजापुरामध्ये 7 रुग्ण आढळल़े बुधवारी 2 हजार 897 आरटीपीआर चाचण्या करण्यात आल्या होत्य़ा तर रॅपिड ऍन्टीजनच्या 4 हजार 817 चाचण्या करण्यात आल्या होत्य़ा जिह्याचा रिकव्हरी दर 93.34 टक्के असून मृत्यू दर 2.85 टक्के इतका नोंदवण्यात आला आह़े