प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात शुक्रवारी कोरोना लसीकरणाची रंगीत तालिम (ड्राय रन) होणार असून यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, दापोली उपजिल्हा रुग्णालय व हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणांची निवड करण्यात आली आह़े शुक्रवारी सकाळी 8 पासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही रंगीत तालीम होणार आह़े प्रत्यकी ठिकाणी 25 डमी लाभार्थ्यांवर रंगीत तालीम होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक ड़ॉ संघमित्रा फुले यांनी दिल़ी
सिरम इन्स्टिटूट व भारत बायोटिक यांच्या कोरोनावरील लसींना ड्रग्ज कन्ट्रोलर ऑफ इंडियाने आपत्कालीन वापरासाठी नुकतीच मान्यता दिली आह़े त्यामुळे देशभर लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीची तयारी सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरी जिह्यातही कोरोना लसीकरणासाठी लागणारी पूर्वतयारी पूर्ण झाली असून शुक्रवारी याची रंगीत तालीम करण्यात येत असल्याचे ड़ॉ फुले यांनी सांगितल़े
लसीकरणासाठी निवडणूक मतदान प्रक्रियेप्रमाणे तयारी करण्यात आली आह़े लसीकरणाच्या संयोजन आणि नोंदींसाठी कोवीन या विशेष ऍपचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष लस देण्याच्या व्यवस्थेसाठी पाच जणांची टीम तयार करण्यात आली आह़े त्यामध्ये एक प्रशिक्षित कर्मचारी प्रत्यक्ष लस देणार असून उर्वरित त्याला सहाय्य करणार आहेत़ लसीकरणासाठी नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनाच ही लस देण्यात येणार आह़े लाभार्थ्याच्या मोबाईवर एक संदेश (एसएमएस) पाठविण्यात येईल़ लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱयाकडून या संदेशाची खातरजमा करून प्रत्यक्ष लस देण्यात येईल़ लसीकरणानंतर लाभार्थ्याला अर्धा तास देखरेखेखाली ठेवण्यात येणार आह़े या काळात त्या व्यक्तील काही त्रास जाणवल्यास तातडीने आवश्यक उपचारांची व्यवस्था करण्यात आली आह़े लसीचे दोन डोस घ्यावयाचे असल्याने पहिल्या लसीकरणानंतर 28 दिवसांनी पून्हा डोस देण्यासाठी त्या व्यक्तीला बेलविण्यात येणार असल्याचे डॉ. फुले यांनी सांगितल़े
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱयांना मिळणार लस
सलिकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जिह्यातील खासगी व सरकारी क्षेत्रातील 14 हजार आरोग्य कर्मचाऱयांना मोफत लस देण्यात येणार आह़े या फ्रन्ट लाईन वर्कर्सचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर 50 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होईल़ त्यासाठीही अन्य गंभीर आजार असलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आह़े