शहरासह तालुक्मयातील 10 जणांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली तरी दररोज 20 ते 30 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. याचबरोबर मोठी लाट येणार, अशी शक्मयता आहे. त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. मंगळवारी जिह्यामध्ये 28 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये शहर, उपनगर व तालुक्मयातील 10 जणांचा समावेश आहे.
बेळगावनंतर गोकाक 5, बैलहोंगल 4, अथणी 4, सौंदत्ती 2, खानापूर 1, रामदुर्ग 1, रायबाग 1 अशी आकडेवारी आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी दररोज रुग्ण आढळत आहेत. तेंव्हा तोंडाला मास्क तसेच सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. पहिल्यापेक्षा आकडेवारी फारच कमी झाली आहे ही बाब सुखद आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये रुग्ण संख्येत मोठी घट झाली. पण आता हवामानामध्ये बदल होत असल्यामुळे रुग्ण संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. रुग्ण बरे होवू लागले आहेत. असे असले तरी संसर्ग पसरु नये याची दक्षता प्रत्येकानेच घेतली पाहिजेत. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि काहीसा गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे इतर आजारांनी अनेक जण त्रस्त झाले आहेत. तेंव्हा प्रत्येकाने सावधानता बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.