प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये सोमवारी कोरोनाचे 518 नवे रुग्ण आढळून आले आहेत़ तर 10 जणांचा मृत्यू झाला आह़े रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी कोरोना चाचण्यांची संख्या दिवसाला 10 हजार करणार असल्याची घोषणा केली होत़ी मात्र सध्याची आकडेवारी पाहता निम्म्या देखील टेस्ट होत नसल्याचेच दिसून येत आह़े त्यामुळे झपाटय़ाने पसरणाऱया कोरोनावर मात कशी करणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह़े
जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी जिह्यात 4 हजार 658 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 258 तर ऍन्टीजेन चाचणीत 153 तर मागील 107 असे 518 कोरोनाबाधित रुग्ण मिळून आल़े जिह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 48 हजार 731 इतकी झाली आह़े
मागील 24 तासांमध्ये 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आह़े जिह्यातील एकूण मृतांची संख्या आता 1 हजार 649 इतकी झाली आह़े तर रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर हा 3.38 इतका आह़े..