प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात शनिवारी 264 नमुन्यांपैकी 65 रूग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आह़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 7 हजार 631 इतकी झाली आह़े तर शनिवारी चिपळूण येथील एका कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 83 बरे झालेल्या रूग्णांना रूग्णालातून घरी सोडण्यात आल़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी आरटीपीसीआरमध्ये 39 व ऍन्टीजेन टेस्टमध्ये 26 असे एकूण 65 कोरोनाचे रूग्ण आढळून आल़े यामध्ये रत्नागिरीत 29, खेड 3, गुहागर 4, चिपळूण 15, संगमेश्वर 10, लांजा 3, तर राजापूर येथे 1 कोरोनाचा रूग्ण सापडला. तर चिपळूण येथील 60 वर्षीय पुरूष रूग्णांचा कारोनामुळे मृत्यू झाला. यामुळे जिह्यातील मृतांची संख्या आता 270 इतकी झाली आह़े तर रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर 3.56 टक्के इतका आह़े मृतांच्या तालुकानिहाय आकडेवारीचा विचार करता रत्नागिरी सर्वाधिक 74, खेड 45, गुहागर 10, दापोली 29, चिपळूण 67, संगमेश्वर 24, लांजा 9, राजापूर 10 तर मंडणगडमध्ये 2 अशा एकूण 270 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.